स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कृष्णा कोळी यांची 'सॉप्टेंजर' कंपनीत निवड!
मिळाले वार्षिक रु. ३.५ लाखांचे पॅकेज !
पंढरपूरः ‘सॉप्टेंजर’ या नामांकीत कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कृष्णा महादेव कोळी यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
आय.टी.क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील ‘सॉप्टेंजर’ या नामांकीत कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या कृष्णा महादेव कोळी या विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ३.५ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ही नामंकित कंपनी भारत, सिंगापूर, मलेशिया, या देशात देखील कार्यरत आहे. आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हीसेस, आयटी प्रोसेस अॅटोमेशन, क्लाऊड सर्व्हीसेस, तसेच नेटवर्क आणि सेक्युरिटी सर्व्हीसेस या क्षेत्रातील ही एक नावाजलेली कंपनी आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या कृष्णा महादेव कोळी यांचे अभिनंदन केले.