*पंढरपूर सिंहगड काॅलेज मध्ये "बेस्ट बिझनेस प्लॅन स्पर्धा" संपन्न*
पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ३१ मे २०२३ रोजी सिंहगडच्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल इंन्ट्ररप्रेनर डेव्हलपमेन्ट सेल यांच्या संयुक्त विद्यमानतून 'बेस्ट बिझनेस प्लॅन स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयआयसी आणि ईडीपी सेल यांच्या माध्यमातून बेस्ट बिझनेस प्लॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहभागी विद्यार्थ्यांना डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी बेस्ट बिजनेस प्लॅन या संदर्भात महत्वपूर्ण विषयावर माहिती दिली. दरम्यान डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी स्पर्धेचे नियम व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बालाजी पवार यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक कुमारी नंदिनी भोसले आणि तृतीय क्रमांक वैष्णवी माळी यांना यांनी पटकाविला.
या स्पर्धेत अनुक्रमे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट व क्रेडिट आदी विषयावर बिजनेस प्लॅन प्रेझेंटेशन देण्यात आले. यामध्ये बांधकामाचे सादरीकरण, बांधकामाचे साहित्य तयार करणे, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारे अवजारे उपकरणे यांची निगा राखणे व दुरुस्ती करणे अशा वेगवेगळ्या विषयावर मुलांनी विविध प्रेझेंटेशन सादर केले.
डॉ. बाळासाहेब गंधारे यांच्यासह प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. स्वप्निल टाकळे, विक्रम भाकरे, प्रा. मनोज कोळी, प्रा. सुबोध साळुंखे आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.