पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न*

 *पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     या निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे आदीच्या उपस्थित सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    या दरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 चालू शैक्षणिक वर्षांतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी इशिका सागर या विद्यार्थिनीला बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

    शैक्षणिक जीवनातील आठवणी सांगताना अनेक विद्यार्थ्यांनी काॅलेज व शिक्षकांबद्दल आदराची भावना व्यक्त केली.

    या दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुष्का तृप्ती यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अंजली चांदणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad