सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सुळेवाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भव्य शाखेचे उद्घाटन..


*सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सुळेवाडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भव्य शाखेचे उद्घाटन..*



  लोकनायक महाराष्ट्राचे मंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी या गावचे अनेक शेतकरी,तरुण मित्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचार धारेत सामील झाले,

   आज दिनांक 13/6/ 2023 सकाळी साडेअकरा वाजता सुळेवाडी गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या फलकाचे अनावरण प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या हस्ते झाले त्यामुळे सुळेवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, होळी गावातील अनेक शेतकरी तसेच तरुणांनी बच्चुभाऊंच्या सेवा,त्याग समर्पण संघर्ष विचार प्रणालीवर प्रामाणिकपणे चालत राहून समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेची शपथ घेतली.

   यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब काळे प्रहार चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवळ तालुका उपाध्यक्ष संभाजी गावडे महिला तालुका अध्यक्ष शिरसागर मॅडम, सुळेवाडी चे सरपंच दडस यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव,तरुण बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad