*सभासदानो जुलमी चेअरमनच्या कचाट्यातून मुक्त व्हा: अभिजीत पाटील*
(परिवर्तनासाठी आंबे येथून ७०टक्के मतदान देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार)
प्रतिनिधी पंढरपूर/-
सहकार शिरोमणीचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी मागील अनेक वर्षापासून सत्ता भोगत असताना, चेअरमन पदाचे कर्तव्य पार पाडले नाही. त्यामधून सभासदाचे हित न पाहता त्यांचे आणि कामगार वर्गाचे केवळ शोषणच केले आहे. यामुळे या जुलमी चेअरमनच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी हीच वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता या निवडणुकीत आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवारांना मते देऊन परिवर्तनाचे लढ्याला यश द्या असे आवाहन विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
तालुक्यातील आंबे येथील बैठकीत अभिजीत पाटील यांनी वरील आव्हान केले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले आहे की, या कारखान्यात बिल उशिरा दिले जाते. याबाबत सभासद यांच्यामधून आवाज ऐकावयास मिळाला होता. परंतु काही जवळच्या लोकांना कांडी पुरल्यावर बिल दिले जात होते. त्यामुळे एकास एक दुजाभाव का करण्यात आला होता. याबाबत जाब विचारण्याची संधी या मतदानाच्या रूपाने आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा काटा हानून वाडीकुरोली येथील एका शेतकऱ्याच्या नावे दोन हजार टन उसाचे बिल काढले गेले असल्याचा गौफ्यस्फोट ही यावेळी अभिजीत पाटील यांनी केला आहे.
पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की विरोधक यांनी सध्या मी विठ्ठल चे संचालक यांचे नावे काढलेले ४०कोटी रुपये याबाबत भलतेच बोलू लागले आहेत.ते कर्ज आपण केलेली घाण काढण्यासाठीच काढले असल्याचा खुलासाही यावेळी पाटील यांनी केला आहे. भालके यांनीही आपणास विठ्ठल कारखान्याचे पैसे कोणाकडे आहेत. असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना बाकीचे लोकांचे राहूदे म्हणत भालके कुटुंबातील लोकाकडे असलेल्या पैसेची लाखो आणि कोटीत आकडेवारी सांगितली आहे. मी ज्या प्रमाणे विठ्ठलचे गाडी, डिझेल आणि इतर सुविधा वापरनार नाही. असे निवडणुकीत ठणकावून सांगितले होते. त्याप्रमाणे हे काळे चेअरमन या निवडणुकीत का बोलत नाहीत असेही सांगितले. मी काटा मारतात म्हणून ओरडून सांगत असताना हे यापुढे तरी आम्ही काटा मारणार नाही असे सांगण्याचे धाडस का दाखवीत नाहीत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मागत. काळे गटाकडून होणाऱ्या आरोपाचा योग्य पद्धतीने खुलासाही केला आहे.
यानिवडणुकीत आपण पराभव होणार हे गृहीत धरूनच त्यांनी आतापासून विठ्ठल ची निवडणूक लढविण्यासाठी सर्वांना एकत्रित करीत नवीन खेळी चालवली असल्याचेही अभिजीत पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे.
यावेळी राजाराम सावंत, औदुंबर शिंदे, सचिन पाटील, तुकाराम मस्के, संभाजीराजे शिंदे,दिपक पवार, डॉ रोंगे सर, यांनी काळे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी सुभाष भोसले, विष्णूभाऊ बागल, शशी पाटील, सचिन अटकले, आदी सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रवेश केला.
चौकट
आंबे येथील एकूण सभासद २८७ आहेत. मयत संख्या ४२आहे. यामधून या गावातून ७०टक्के मतदान अभिजीत पाटील यांच्या गटाचे उमेदवार यांना देण्याचा मानस असल्याचे राजाराम सावंत यांनी गावकऱ्यांच्या वतीने जाहीर केले आहे.