*सिंहगड मध्ये नॉन कन्वेंशनल मशीनिंग या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात "नॉन कन्वेंशनल मशीनिंग" या विषयावर प्रा. जेऊरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
सोमवार दिनांक १२ जुन २०२३ रोजी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात नॉन कन्वेंशनल मशीन या विषयावर प्रा. एस. ए. जेऊरकर यांनी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी प्रा. जेऊरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलत जेऊरकर म्हणाले, पारंपारिक मशीनिंग व नॉन कन्व्हेंशनल मशीन विभिन्न आहेत. थ्रीडी प्रिंटिंग अल्ट्रासोनिक मशीन इन तसेच ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी यावर प्रा. जेऊरकर यांनी विस्तृत माहिती दिली.
हा कार्यक्रम सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. धनंजय गिराम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, प्रा. समाधान माळी सह विशाल नवले, धनाजी केवटे आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.