स्वेरीत 'अ‍ॅश्रे मेंबरशीप अँड करीअर अपॉर्चुनीटीज' या विषयावर सेमिनार संपन्न

                                                                                                               

स्वेरीत 'अ‍ॅश्रे मेंबरशीप अँड करीअर अपॉर्चुनीटीज' या विषयावर सेमिनार संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अ‍ॅश्रे मेंबरशीप अँड करीअर अपॉर्चुनीटीज' या विषयावर एक दिवशीय सेमिनार नुकताच संपन्न झाला. 

            अ‍ॅश्रे पुणे चॅप्टरच्या प्रेसिडेंट सौ.अनुश्री रिसवडकर, प्रेसिडेंट इलेक्ट. यश कारखानीस व इनबाक (आयएनबीएसी) संस्थेच्या प्रेसिडेंट सौ.सखी चंद्रायन हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'अमेरिकन सोसायटी फॉर हिटींग, रेफ्रिजरेटींग व एअर कंडिशनींग' या आंतरराष्ट्रीय संघटनेची एक विद्यार्थी शाखा स्वेरी मध्ये २०१९ सालापासून कार्यान्वित आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅश्रेचे सदस्य होण्याचे फायदे व रेफ्रिजरेशन क्षेत्रात करिअर संधी’ याबाबत माहिती देण्यासाठी हा सेमिनार ठेवण्यात आला होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्रा.प्राजक्ता सातारकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वेरीच्या अश्रे ब्रँचचे मार्गदर्शक प्रा.दिग्विजय रोंगे यांनी ब्रँच तर्फे घेण्यात आलेले विविध कार्यक्रम व उल्लेखनीय कामगिरीबद्दल सविस्तर माहिती दिली. यश कारखानीस यांनी अ‍ॅश्रे बद्दल तसेच अ‍ॅश्रेचे सदस्य झाल्यानंतर होणारे फायदे व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास या बाबींवर प्रकाश टाकला. ‘अ‍ॅश्रेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर करीअर घडवू शकतात.’ असे त्यांनी प्रतिपादन केले. सौ.सखी चंद्रायन यांनी ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणार्‍या जीवन कौशल्यांवर' महत्वपूर्ण भाष्य करताना म्हणाल्या की ‘तांत्रिक माहिती बरोबरच प्रोब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन व कॅरॅक्टर ह्या गोष्टी आयुष्यात खूप उपयोगी पडतात.’ अ‍ॅश्रे स्वेरी स्टुडंट ब्रँचचे विद्यार्थी शुभम यमगार व आकांक्षा शेळके यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले तर ब्रँचचे मार्गदर्शक प्रा.दिग्विजय रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad