*पंढरपुर सिंहगड मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात मंगळवार दिनांक ६ जुन २०२३ रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्ये उपस्थित होते.
या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती. राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले. या सोहळ्यासाठी विविध राज्यांचे राजदूत, प्रतिनिधी, परदेशी उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते. शिवाजीने छत्रपती ही पदवी धारण केली. यामध्ये काशीचे पंडित विश्वेश्वर जी भट्ट यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांच्या राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले. या कारणास्तव, ४ ऑक्टोबर १६७४ रोजी त्यांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला. दोन वेळा झालेल्या या सोहळ्यात सुमारे ५० लाख रुपये खर्च झाले. या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विजयनगरच्या पतनानंतर दक्षिणेतील हे पहिले हिंदू राज्य होते एखाद्या स्वतंत्र राज्यकर्त्याप्रमाणे स्वराज्याला स्वतःची ओळख मिळाली.
शिवाजी महाराज छत्रपती झाले राज्याभिषेकच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजी महाराजांबर अभिषेक केला गेला. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. शिवाजी महाराज ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले.
यावेळी उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, प्रा. यशवंत पवार, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. गुरूराज इनामदार सह महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून दीपप्रज्वलन करून छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील पांडूरंग परचंडे, नवनाथ माळी,
संतोष भुजबळ, गणेश वसेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन केले