*पंढरपूर सिंहगडचे प्रा. सोमनाथ कोळी यांना पीएच.डी प्रदान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सोमनाथ कोळी यांनी आंध्रप्रदेशातील कोनेरू लक्ष्मय्या के एल विद्यापीठ विजयवाडा विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
केएल विद्यापीठ विजयवाडा येथे "स्थिर कार्यरत डिझेल इंजिनसाठी पर्यायी इंधन" या विषयावर प्रा. सोमनाथ कोळी यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायन्स सायटेशन इंडेक्स मध्ये २ तर स्कोपसमधील ३ जर्नल आर्टिकल प्रसिद्ध झाले आहेत.
ओंगोल आंध्र प्रदेश क्यु आय एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. वाय व्हीं हनुमंत राव आणि के एल विद्यापीठातील डीन आय क्यू अस सी सेल डॉ. के रामकृष्ण यांनी या प्रबंधासाठी मार्गदर्शन केले.
प्रा. सोमनाथ कोळी यांनी पीएच डी प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. राहुल शिंदे, प्रा. गणेश लकडे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व विद्यार्थीनी अभिनंदन केले.