पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा*




पंढरपूर: प्रतिनिधी 



एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

   ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या ४०० विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदवून पर्यावरण तसेच विविध पर्यावरण विषयी पोस्टर बनवून पर्यावरण संरक्षण व बचावासाठी जनजागृतीचे काम केले. यामध्ये हवामान बदल, प्रदूषण, प्लास्टिकचा दुरुपयोग, ई कचरा, वृक्ष लागवडीचे महत्त्व, पारंपारिक व अपरंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्त्व अशा अनेक विषयावर अतिशय उत्कृष्टपणे पोस्टर बनवून समाजामध्ये जनजागृतीचे काम केले.

  २०२३ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम "बीट प्लास्टिक" च्या अनुषंगाने प्लास्टिकचा बचावात्मक उपयोग तसेच कागदी व नैसर्गिक कापडी पिशव्यांचा उपयोग यावरती विशेष पोस्टर बनवले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदींच्या हस्ते फितकापून करण्यात आले.

  यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशनचे परीक्षण डॉ. संपत देशमुख, डॉ. दीपक गानमोटे, डॉ. अतुल आराध्ये, प्रा. शिवाजी पवार, प्रा. संतोष बागल, प्रा. उमेश घोलप यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा अभिजीत सवासे यांनी काम पाहिले.

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad