*काळे गटाचा कोर्टी येथून प्रचार शुभारंभ.*
*हजारो मतदार सभासदानी दाखविली उपस्थिती,*
*सत्ता कायम राहण्याची खात्री झाली पक्की*
*---------------------------------------*
पंढरपूर/प्रतिनीधी - *पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची निवडणूक आता तिसऱ्या टप्यावर येऊन पोहचली आहे. या निवडणुकीत दुरंगी लढत लागली आहे. दोन्ही पॅनल कडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ केला आहे. यामध्ये सत्ताधारी काळे गटाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ बुधवारी सकाळी कोर्टी येथील शभू महादेवास नारळ फोडून करण्यात आला. यावेळी हजारो मतदार सभासद उपस्थित होते. यामुळे सत्ता कायम राहील याची खात्री झाली आहे.*
या प्रचार शुभारंभ प्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे, युवराज पाटील, ऍड गणेश पाटील, शेखर भालके यांच्यासह विठ्ठलचे माजी संचालक, सहकार शिरोमणी चे आजी माजी संचालक उपस्थित होते.
*यावेळी आयोजत करण्यात आलेल्या बैठकीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांनी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर घणाघाती टिका केली. मागील दोनवेळा बिनविरोध निवडनुक झाली . तर दोनवेळा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यामध्ये विरोधी पॅनलच्या उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. मागील वेळेस दोन पॅनल विरोधात होते त्याची दोघांची मिळून बेरीज 2हजार मताच्या आत आहे.त्यामुळे त्यांनी मिळून आता तयारी दाखवली असली तरीही त्यांना दोन हजाराच्या आतच मतदान होईल असेही काळे यांनी खात्रीने सांगितले आहे. आमचा सभासद हा स्वाभिमानी आहे. त्यामुळे विरोधकांच्या दिशाभूल भाषणात भुलनार नाही.असेही काळे यांनी सांगितले. मागील वर्षी विठ्ठलच्या निवडणुकीतही अशाच प्रकारे सभासद,कामगार, तोडणी वाहतूकदार यांना आश्वासन दिले होते. त्याला कामगार सभासद बळी पडले होते. त्यानंतर कामगारांना जुन्या पगारी पूर्ण दिल्या का असा सवाल करीत त्यांना आमचा कामगार नक्की भूलनार नसल्याचे सांगितले.*
*विरोधक यांना नवीन कारखाना उभारणीसाठी काय यातना असतात याची कल्पना नाही. जुना कारखाना भाडे तत्वावर घेऊन त्यासाठी कोण तरी पैसेवाला भागीदार घ्यायचा एवढंच माहिती आहे. त्यामधे चालला ठीक नाहीतर परत हीच त्याची भूमिका असल्याची टीका अभिजीत पाटील यांच्यावर केली. आम्ही कमी गाळप करूनही 50 कोटी पर्यंत बँकेचे कर्ज फेडले आहे. आपण सात लाख गाळप करून विठ्ठलचे किती कर्ज फेडले याचा खुलासा करावा अशी मागणीही काळे यांनी केली.*
यावेळी युवराज पाटील यांनीही आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेताना डॉ बी.पी . रोंगे सर आणि चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली. विठ्ठलच्या निवडणुकीत दोघांचे भांडण अन् तिसऱ्याचा लाभ अशी अवस्था झाली. हीच गत यावेळी होऊ नये म्हणून आम्ही एकत्रित आलो असल्याचे सांगितले. मी कर्मवीर आण्णांचा नातू असल्याने या विठ्ठल कारखान्यावर आकडेवारीत मी जागृत असल्याचेही सांगितले.
*ॲड.गणेश पाटील यांनीही आपल्या भाषणात अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली. आमच्यामध्ये फोडाफोडी करून करीत सभासद आणि कामगार यामध्ये संभ्रम निर्माण करायचे काम सुरू आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात आता आम्हाला एकत्रित आल्याशिवाय पर्याय नाही असेही सांगितले. सहकार शिरोमणी कडून कर्ज फेडण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत. एम एस सी बँकेच्या कर्जासाठी एकरकमी परतफेड योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी पैसेही भरले आहेत. यामुळं काही देणे देण्यास विलंब लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.*
या शुभारंभ प्रसंगी समाधान काळे, विजयसिंह देशमुख, शेखर भालके, सुधाकर कवडे, समाधान फाटे, नितीन बागल, रामभाऊ बागल, महेश येडगे, महादेव देठे माऊली जवळेकर यांच्यासह अनेक सभासद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर पंढरीनाथ लामकाने, शरद मोरे, पांडुरंग भोसले, पोपट गाजरे, इब्राहिम मुजावर, पांडुरंग नाईकनवरे, पाटलू पाटील,मेजर विलास भोसले, शशिकांत बागल, नंदकुमार उपासे, गोरख ताड, रणजित पाटील, प्रदीप निर्मळ, संजय माने, विकास माने आदी सह अनेक विठ्ठल परिवारातील विविध गावाचे पदाधिकारी उपस्थित होते