*पंढरपूर सिंहगड मध्ये दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी "प्रोटेक्शन ऑफ क्रिएटिव्हिटी अंडर काॅपीराईट लाॅज" या विषयावर प्रा. आशिष जोशी यांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्रा. अंजली पिसे यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक १ जुन २०२३ व शुक्रवार दिनांक २ जुन २०२३ रोजी "प्रोटेक्शन ऑफ क्रिएटिव्हिटी अंडर काॅपीराईट लाॅज" या
विषयांतर्गत दोन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान प्रा. आशिष जोशी यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना प्रा. आशिष जोशी म्हणाले, कॉपीराइट कसे फाइल करावे, वेबसाइटवर कसे अपलोड करावे, त्यासाठी भरायची माहिती? वेबसाईटची तपशीलवार माहिती कशी अपलोड करावी याबाबत प्रा. आशिष जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अंजली पिसे, प्रा. गणेश बिराजदार, प्रा. स्वप्निल टाकळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.