*पंढरपूर सिंहगडच्या अविनाश भिलारे यांची ३ कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधिल काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात चालू शैक्षणिक वर्षांत शिक्षण घेत असतानाच सोनके (ता.पंढरपूर) येथील अविनाश औदुंबर भिलारे या विद्यार्थ्यांने पुणे येथील देवअँगल्स सॉफ्टवेअर प्रा. लिमिटेड, एफसीएपी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड आणि एमडॉक्स या तीन मल्टिनॅशनल कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या तीन ही कंपनीत अविनाश भिलारे यांची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य जसे की इंग्रजी संभाषण कौशल्य, स्टेज डेरिंग तसेच आत्मविश्वास या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणातून दिले जाते. महाविद्यालयातील प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षापासूनच प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांना नक्कीच प्लेसमेंट मधुन यश मिळवू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी याचीही जाणीव विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच करून देणे आवश्यक असुन त्याचा सराव करून घेणे हीसुद्धा एक महाविद्यालयांमधील प्रशिक्षकांची एक जबाबदारी आहे. विद्यापीठाच्या पाठ्यक्रमधील कॉम्प्युटर भाषा हा केवळ पाठ्यक्रमचा भाग न समजता हे एक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात दरवर्षी ३ लाख ते ३० लाख वार्षिक पॅकेज देणाऱ्या नामांकित कंपन्या थेट पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात येत असुन याचा फायदा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे.
काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील अविनाश औदुंबर भिलारे या विद्यार्थ्यांला देवअँगल्स सॉफ्टवेअर प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज-२.८० लाख), एफसीएपी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज-८.२० लाख) आणि एमडॉक्स कंपनीत (५.३० लाख) वार्षिक पॅकेज मिळणार असुन या तीन कंपनीत निवड झालेले अविनाश भिलारे हे एफसीएपी टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज-८.२० लाख) कंपनीत जाॅईन करणार आहेत.
विविध कंपनीत निवड झालेल्या अविनाश औदुंबर भिलारे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.