पंढरपूर सिंहगडच्या आसावरी बोक्से ची ३ मल्टिनॅशनल कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमारी आसावरी अनंत बोक्से हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड काॅलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत प्लेसमेंट सुविधा उपलब्ध असुन या कॅम्पस प्लेसमेंट मधुन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमारी आसावरी अनंत बोक्से या विद्यार्थिनीने काॅग्निझंट, कॅपजेमिनी आणि टी. सी. एस. (टाटा कन्सलटन्सी सर्विसेस) या ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखती दिल्या होत्या. तिन्ही कंपनीत कुमारी आसावरी बोक्से हिची निवड झाली असुन यामध्ये निवड झालेल्या टाटा कन्सलटन्सी सर्विसेस कंपनीत ३.३७ लाख वार्षिक पॅकेज, काॅग्निझंट आणि कॅपजेमिनी कंपनीत ४ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. विविध कंपनीत निवड झालेली कुमारी आसावरी बोक्से काॅग्निझंट कंपनी जाॅईन करणार असल्याचे तिने सांगितले. कॉग्निझंट कंपनी ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञानातील कंपन्यांमध्ये काॅग्निझंट कंपनीचा समावेश असुन अशा कंपनी कुमारी आसावरी बोक्से हिला काम करण्याची संधी मिळणार आहे.
काॅग्निझंट व कॅपजेमिनी या माहिती तंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्रातील प्रमुख कंपन्या असुन या दोन कंपन्या सोलापूर जिल्ह्य़ातील फक्त पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी येत असुन एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अशा नामांकित आय. टी. कंपनी नोकरी च्या संधी खुप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
कुमारी आसावरी बोक्से हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.