स्वेरीच्या ऋतुजा गायकवाड यांची असेंचर कंपनीत निवड


स्वेरीच्या ऋतुजा गायकवाड यांची असेंचर कंपनीत निवड



पंढरपूरः-‘असेंचर’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता पंढरपूर) श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऋतुजा युवराज गायकवाड यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

          आय.टी. क्षेत्राशी संबंधीत नामांकित असलेल्या ‘असेंचर’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या ऋतुजा युवराज गायकवाड या विद्यार्थीनीची निवड केली असून त्यांना वार्षिक ४.५ लाख रु. इतके पॅकेज मिळाले आहे. शिक्षकांचे प्रयत्न व विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत असल्यामुळे स्वेरीवर पालकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, ऍडव्हान्स्ड टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव्ह, ग्रुप डिस्कशन सॉफ्टवेअर ट्रेनिंग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावरील संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज, जीआरई टफेल यासारख्या स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थिनीला स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या ऋतुजा गायकवाड यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.