स्वेरीचे प्रा.अमरजीत केने यांना आय.आय.टी कानपूर कडून पीएच.डी. प्रदान
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. अमरजीत प्रकाशराव केने यांनी कानपूरच्या आय.आय.टी मधून पीएच.डी. पूर्ण केली आहे त्यामुळे आता स्वेरीतील पीएच.डी. धारक प्राध्यापकांची संख्या ३६ इतकी झाली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने 'शिकवता शिकवता उच्च शिक्षण घेणे' या सूत्रानुसार संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. अमरजीत केने यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून ‘एक्सपरीमेंटल इनव्हेस्टीगेशन अँड मॉडेलिंग ऑफ टूल हेल्थ मॉनिट्रींग सिस्टम युजींग मल्टीपल सेन्सर डाटा फ्युजन अप्रोचेस इन टर्निंग ऑफ हार्डेनड स्टील’ या विषयात पीएच.डी. पूर्ण केली.
गोपाळपूर येथील 'स्वेरी'चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा. केने यांनी ही पीएच.डी.पूर्ण केली. त्यांना स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. केने यांनी सांगितले. ‘स्वेरी’ या संस्थेच्या नावातच 'रिसर्च' हा शब्द असल्याने सुरुवातीपासूनच स्वेरीमध्ये संशोधनास प्रोत्साहन दिले जाते. स्वेरीमध्ये असणारे संशोधनपूरक वातावरण, विविध संस्थासोबत असणारे सामंजस्य करार, उपलब्ध असणाऱ्या विविध संशोधनपर प्रयोगशाळा या सर्व बाबींमुळे स्वेरीतील वातावरण हे संशोधनास अतिशय पोषक बनले आहे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्वेरीतील पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांची संख्या वरचेवर वाढत आहे. आज स्वेरीमध्ये सुमारे ३६ प्राध्यापक हे पीएच.डी. धारक असून सुमारे ३० प्राध्यापकांची पीएच.डी. सध्या सुरू आहे. वाढत्या व्यापामधून डॉ. केने यांनी पीएच.डी. पूर्ण केल्याबद्दल त्यांचा तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ.एन.बी.पासलकर यांच्या हस्ते व डॉ. विजय केळकर, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ.केने हे स्वेरीमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. ते सध्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी ते फ्रान्स मध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झाले होते. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल डॉ. केने यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.