*सिंहगडच्या विद्यार्थ्यांची उजनी धरणास भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उजनी धरणाची भेट आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षातील इंजिनिअरिंग जिओलॉजी व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना हायड्रॉलिक स्ट्रक्चर अँड वॉटर पाॅवर इंजिनिअरिंग मध्ये समाविष्ट असल्याने अभ्यासाचा भाग म्हणून हि भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटी मध्ये या धरणाची उंची, पाणी साठवण क्षमता याशिवाय विविध भागाची पाहणी केली. उजनी धरणातील संबधित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धरणाचे कार्य व त्यासंबंधी विविध प्रकार विषयी यांची तेथील पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या भेटीचा उपयोग सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करण्यासाठी होणार आहे.
या मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ११५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि भेट यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. अमोल कांबळे, प्रा. सुजित राठोड, प्रा. विक्रम भाकरे, प्रा. निखत खान, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. सिद्धेश पवार आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.