पंढरपूर सिंहगड मध्ये " स्टार्टअप व उद्योगासाठी शासनाकडून शासकीय अनुदान योजना " या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये " स्टार्टअप व उद्योगासाठी शासनाकडून शासकीय अनुदान योजना " या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात बुधवार दिनांक १४ जुन २०२३ रोजी "स्टार्टअप व उद्योगासाठी शासनाकडून शासकीय अनुदान योजना" या विषयावर श्रीकांत आव्हाड यांची एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती डाॅ. चेतन पिसे यांनी दिली.

   या कार्यशाळेच्या सुरुवातीस मार्गदर्शन व्याख्याते श्रीकांत आव्हाड यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले. दरम्यान डाॅ. चेतन पिसे यांनी श्रीकांत आव्हाड यांचा परिचय करून दिला.

    या दरम्यान बोलताना श्रीकांत आवड म्हणाले की, नेमके कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचे हे सुद्धा समजणे फार आवश्यक आहे. लहान लहान उद्योगधंदे आपल्याकडे पूर्वीसारखी सुरू होत आहेत. पण आज तरुणाला भुरळ पडले आहे ती स्टार्टअप संकल्पनेची खर तर स्टार्टअप ची आज क्रेझ झाली आहे. म्हणून स्टार्टअप म्हणजे काय ते माहिती असणे फार आवश्यक आहे. अल्पावधीतच स्टार्टअपने सर्वत्र उद्योग क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत असून भविष्यातील उद्योग क्षेत्रात नक्कीच वाढ होणार आहे. याशिवाय हे उद्योग उभे करत असताना शासकीय अनुदाचा लाभ कसा घ्यावा? तो का आवश्यक आहे यांची माहिती असणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. स्टार्टअप सुरू करत असताना अनेक उद्योगासाठी शासनाकडून अनुदान सुविधा उपलब्ध आहे. आपण आपल्या करिअरच्या संधीना स्टार्टअप सुरू करून वाव देऊ शकतो. असे मत श्रीकांत आव्हाड यांनी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ऑनलाईन कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.

 पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत महाविद्यालयातील १०० हून अधिक विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad