*सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांची "टेक्समो सॉफ्टवेअर सोल्युशन" या इंडस्ट्रीला भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी "टेक्समो सॉफ्टवेअर सोल्युशन या इंडस्ट्रीला" येथे भेट दिली असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांची टेक्समो सॉफ्टवेअर सोल्युशन पुणे येथे इंडस्ट्रियल भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीमध्ये सॉफ्टवेअर कंपनी कशी काम करते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ची लाइफ सायकल आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. श्याम भिमदे, प्रा. मनोज कोळी, प्रा. ऋतुजा साबळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.