मनोरमा बँकेच्या संचालक पदी स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे यांची निवड


मनोरमा बँकेच्या संचालक पदी स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे यांची निवड




पंढरपूर : सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व वार्षिक सुमारे साडे नऊशे कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या मनोरमा सहकारी बँकेच्या नूतन संचालकपदी पंढरपूर येथील स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

      बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची ही बिनविरोध निवडणूक पार पडली. नव्या संचालक मंडळामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचा समावेश करण्यात आला आहे. मनोरमा बँकेच्या पुणे व सोलापूर येथे सहा शाखा आहेत तसेच मनोरमा मल्टीस्टेटच्या ७२ शाखा आहेत, मनोरमा बँक, मनोरमा मल्टीस्टेट व इतर संस्था यांची एकूण वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार ९५० कोटींची आहे. बँकेचा एनपीए गेल्या पाच वर्षांपासून शून्य टक्क्यांवर आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना तांत्रिक व व्यावसायिक दृष्ट्या भक्कम बनविण्यासाठी डॉ.बी.पी.रोंगे सर हे नाव राज्यात प्रसिद्ध आहे. ‘स्वेरी परिवार व इंजिनिअरिंग कॉलेज, पंढरपूर या संस्थांची शिस्तबद्ध व यशस्वी रीतीने वाटचाल करणारे प्राचार्य डॉ.रोंगे सर यांच्या शिस्तीचा व अनुभवाचा मनोरमा परिवार व बँकेस निश्चितपणे लाभ होईल तसेच नव्याने होणाऱ्या पंढरपुर शाखेच्या वाटचालीसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांचा सक्रीय सहभाग व बहुमोल मार्गदर्शन निश्चितपणे मोलाचे ठरेल.’ असे गौरवोद्गार बँकेचे चेअरमन व मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांनी काढले. पंढरपूर तालुक्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून डॉ.रोंगे सरांच्या या निवडीचे स्वागत केले जात आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, मनोरमाचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, परिवाराच्या मार्गदर्शिका शोभा मोरे, तसेच सिताराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे,सहायक निबंधक व्ही.बी. माने, माजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विश्वासराव मोरे, डॉ.एम.एम. पवार यांनी नूतन संचालक डॉ. बी.पी. रोंगे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad