*काळे सोबत फिरणारे मोकळ्यात बोलणारे*
*रोपळे येथील जाहीर सभेत अभिजीत पाटील यांची भालकेसह युवराज पाटील अन् गणेश पाटील यांच्यावर टीका*
प्रतिनिधी पंढरपूर/-
सध्या सहकार शिरोमणीची ही निवडणूक सुरू आहे. यामध्ये सत्तांतर करण्यासाठी आम्ही आमचं पॅनल निवडणुकीत उतरविले आहे. यामुळे मी यामध्ये उमेदवार नसतानाही ठामपणे आपले देणे देण्याची हमी घेतली आहे. तसे सत्ताधारी काळे यांच्यासाठी जे नेते धावधाव करीत आहेत. ते नेते स्वतः ही देणं देण्याची हमी घेत नसून ते नुसत मोकळ्यात बोलत आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व नाही असा टोला चेअरमन अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके, युवराज पाटील आणि गणेश पाटील यांना लगावला आहे.
शुक्रवारी सायंकाळी रोपळे येथे परिवर्तन पॅनलचे उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी निवडणूक असतानाही ज्यांनी सभासद आणि कामगार यांचं देणं देण्याची सोय लावली नाही. यापेक्षा दुसर काही दुर्दैव नसून यापुढेही बिले मिळणे अवघड वाटत असल्यानेच, आमच्यावर विश्वास ठेऊन अनेकजण आमच्याकडे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक सहकार शिरोमणी कारखान्याची असून आम्ही त्याबाबत विश्वास देत आहोत. मात्र काळे यांच्याकडून विषय बदलून आमच्यावर वेगळी टीका केली जात आहे.त्यामुळे या कारखान्यातील सभासद आणि कामगार यांना याबाबत सर्वकाही आता समजले आहे असेही पाटील यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना अभिजीत पाटील यांनी काळे यांना अडचणीमुळे जमले नाही. त्यामुळे आता हैद्राबादला जाऊन आलेले भगीरथदादा बिलासाठी मदत करतील अन् घोषणा करतील असे वाटले होते. युवराज पाटील आणि गणेश पाटील यांचेकडून काही मदत होईल असे वाटले होते. परंतु असे कुठच काही दिसून आले नाही.त्यामुळे ही निवडणूक परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही असेही पाटील यांनी सांगितले. बाकी कारखान्याची अवस्था आणि काळे यांच्या मागील अनेक वर्षातील कारभार तोट्यात कसा आला आहे. याची माहिती देऊन आपण या कारखान्याला सुधारून दाखवू शकतो असा विश्वासही अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी डॉ बी.पी . रोंगेसर, प्रा. तुकाराम मस्के, अमरजित पाटील, रणजित बागल, संजय पाटील, यांच्यासह या भागातील लोकांनी भाषणे केली.
प्रत्येक वर्षी तोट्यात हिशोब दाखविणाराचा हिशोब करा
सहकार शिरोमणी साखर कारखाना चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे कारभार आल्यापासून व्यवहार व्यवस्थित न पार पडल्याने बदनाम होत आहेत. कारखान्याचा दरवर्षी तोटा वाढविण्याचे काम चालू आहे. मागील वेळेस संधी दिली होती. त्या संधीचे सोने करण्याऐवजी माती करून ठेवली आहे.त्यामुळे आता त्यांचा हिशोब करून घरी पाठवायचे यासाठी हा परिवर्तनाचा लढा मागील अनेक वर्षापासून सुरू असून या लढ्याला या निवडणुकीत नक्की यश मिळेल असा विश्वास दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.