*सिंहगडची इशिका सागर बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (पंढरपूर) येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कुमारी इशिका सुभाष सागर हि यावर्षीची बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट ठरली असुन महाविद्यालयाच्या वतीने तिचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शनिवार दिनांक १० जुन रोजी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे होते.
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर उपस्थित होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षातील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे यादरम्यान स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या चार वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच्या आठवणीना आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. समीर कटेकर, डाॅ. भालचंद्र गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती उत्पात व अनुष्का घोटाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्ना गोड यांनी मानले.