सिव्हील अभियंत्यांना बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती असावी -सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर स्वेरीमध्ये ‘सेसा-२ के२३’ संपन्न


सिव्हील अभियंत्यांना बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती असावी -सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर 


स्वेरीमध्ये ‘सेसा-२ के२३’ संपन्न



पंढरपूर- ‘स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सखोल ज्ञान आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आत्मविश्वास वाढतो तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भावी अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रातील सखोल माहिती मिळविणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम क्षेत्राशी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बांधकामाची, साहित्यांची, साधनांची व त्यासाठी वापरात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेतल्यास हाती घेतलेल्या प्रकल्पास व कार्यास बळकटी येते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व शासनाच्या जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर यांनी केले.

             स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सेसा २ के २३' अंतर्गत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी व शासनाच्या जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर हे सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. विशेष अतिथी म्हणून शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात जलसंधारण वर्ग-२ चे अधिकारी असणारे महेश क्षीरसागर हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी ‘सेसा-२ के २३’ या उपक्रमासंबंधी माहिती देऊन ‘सेसा’ सारख्या संशोधनात्मक स्पर्धांच्या माध्यमातून संशोधनासाठी चालना मिळते.’ असे सांगितले. सहाय्यक अभियंता प्रदीप क्षीरसागर म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलभूत संकल्पना समजावून घेत नियोजनबद्ध तयारी केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळणे सहज शक्य होईल.’ असे सांगितले. या उपक्रमांतर्गत ब्रीज मेकिंग, कॅड रेस, पोस्टर प्रेझेन्टेशन, सर्वे हंट, फन झोन आदी स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी विभागात सर्वत्र सिव्हील इंजिनिअरिंग संबंधित बांधकामाच्या विविध आकर्षक प्रतिकृती तयार केल्या होत्या. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, प्रा.ए.बी.कोकरे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.समीर मस्के, प्रा.एन.डी.मोरे, विद्यार्थी सेसा अध्यक्ष कृष्णा भोसले, सेसा उपाध्यक्ष दीपक शिंदे, सचिवा शुभांगी उंबरजे, खजिनदार शहीद बागवान यांच्यासह ‘सेसा’चे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग तसेच स्वेरीचे व इतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास दिडशेहून अधिक विद्यार्थी, स्पर्धक उपस्थित होते. राजनंदिनी पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर हर्षदा घोळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad