*पंढरपूर सिंहगड मध्ये "शोधनिबंध कसा लिहावा" या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी शोधनिबंध कसा लिहावा (How to Write Research Paper) या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आला होते. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात *शोधनिबंध कसा लिहावा* (How to Write Research Paper) या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, या चर्चासत्रात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील शिक्षक वृंद, तसेच द्वितीय, तृतीय आणि शेवटच्या वर्षातील १०० हून अधिक विद्यार्थी
सहभागी झाले होते.
या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च पेपर कसा लिहावा या विषयावर माहिती देण्यात आली. चर्चासत्रासाठी डॉ. परिक्षीत नरेंद्र महाल्ले, डीन संशोधन आणि विकास, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे, यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
महाल्ले यांनी रिसर्च पेपर बद्दल खूप माहिती दिली तसेच चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी रिसर्च पेपर लिहीत असताना कशा प्रकारे लिहावा, नाव कसे द्यावे, कंटेंट कसे निवडावेत, कोणत्या गोष्टी समाविष्ठ केल्या पाहिजेत याची माहिती दिली.
हे चर्चासत्र काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होते. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.