*पंढरपूर सिंहगड मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांमध्ये एनर्जेटिक 2K 23 स्पर्धा उत्साहात संपन्न*
पंढरपूर प्रतिनिधी
कोर्टी तालुका पंढरपूर येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एनर्जेटिक 2K23 स्पर्धा उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलास कारंडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एनर्जेटिक 2K23 स्पर्धा आयोजित करण्यात आले होते .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास कारंडे व उपप्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले सुरुवातीस स्पर्धेबद्दल माहिती प्रा.प्रदीप व्यवहारे यांनी दिली व डॉक्टर बी बी गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये इंडस्ट्रियल ड्राईव्ह, कॉन्सन्ट्रिका, टेसला माईंड, पीपीटी प्रेझेंटेशन या चार स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कसला माईंड या स्पर्धेमध्ये कृष्णा गंजे यांना प्रथम क्रमांक व शिंदे यांना द्वितीय क्रमांक भेटला. इंडस्ट्रीज ड्राईव्ह या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या चव्हाण यांना प्रथम क्रमांक व चंद्रिका ढाळे यांना द्वितीय क्रमांक भेटला, पीपीटी प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये आकांक्षा शेळके व अश्विनी बोडके यांना प्रथम क्रमांक भेटला व दिपाली सुडके, साक्षी जवंजाळ , दिशा होनमाने यांना द्वितीय क्रमांक भेटला. कॉन्सन्ट्रिक या स्पर्धेमध्ये साक्षी खांडेकर यांना प्रथम व अक्षय शिंदे यांना द्वितीय क्रमांक भेटला
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉक्टर बी बी गोडबोले, डॉ . आर एम पाटील आधीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली सुडके व अनुष्का कोठारे व आभार प्रदर्शन पल्लवी लोखंडे यांनी केले.