*पंढरपूर सिंहगड मध्ये इब्राहिम शेख यांचे व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये नॅशनल इनोव्हेशन डे निमित्त बिझनेस डायरेक्टर क्राॅक्रीट सिका इंडिया प्रा. लि. चे इब्राहिम शेख यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाची सुरुवात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, व्याख्याते इब्राहिम शेख, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार यांच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दरम्यान इब्राहिम शेख यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी इब्राहिम शेख यांनी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना इनोव्हेटिव्ह काँक्रिट, ट्रान्सपरंट अँड सेल्फ हिलिंग काँक्रिट वर महत्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. भालचंद्र गोडबोले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.