*पंढरपूर सिंहगड मध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट काँक्रीट च्या प्रमाणता ठरवणे या विषयावर इब्राहिम शेख यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळे प्रकारचे काँक्रिट पाहत आसतो. तर हे काँक्रिट कसे तयार होते. ते तयार करण्यासाठी कुठल्या पद्धती आहेत व त्याचे किती प्रमाण असावे हे इब्राहिम शेख यांनी सविस्तर सांगितले.
एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात गुरुवार दिनांक ११ मे २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या काँक्रिट विषयी माहिती मिळण्यासाठी आयोजित केले होते.
या व्याख्यानाचे सुरुवात इब्राहिम शेख, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना सविस्तर अभ्यास करण्यास सांगितले.
यानंतर इब्राहिम शेख यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुमित्रा सांगोलकर या विद्यार्थिनीने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. गणेश लकडे, प्रा. यशवंत पवार, प्रा. अजित करांडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. निखत खान, प्रा. सुजित राठोड, प्रा. शेखर पाटील, प्रा. विक्रम भाकरे, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. सिध्देश पवार, दत्तात्रय नवले, सुर्यकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले.