स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश...
पंढरपूर- ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ व ‘इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर मधील नेहरूनगर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात 'डिप्लोमा युथ फेस्टिवल' चे आयोजन करण्यात आले होते. या युथ फेस्टिवल मध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये स्वेरी संचालित फार्मसी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वेरीने वार्षिक परीक्षांचे निकाल, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी बाबतीत सातत्याने आघाडी घेतली आहे हे सर्वश्रुत आहे. पण आता या यशस्वीतेत आणखी भर पडली असून क्रीडा विभागातही स्वेरी आपला यशाचा झेंडा फडकवत आहे. ‘डिप्लोमा युथ फेस्टिवल’ मध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील कॅरम (डबल) या प्रकारात स्वेरी फार्मसी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या पार्थ दिनेश रावल आणि सुरज बाबुराव पवार यांनी आपली उत्कृष्ठ खेळी साकारत प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.वैभव गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.