स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये पाच दिवशीय कार्यशाळा संपन्न

                                         

स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग

विभागामध्ये पाच दिवशीय कार्यशाळा संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी शॉर्ट टर्म ट्रेनींग प्रोग्राम (एसटीटीपी) आयोजित करण्यात आला होता. ‘हँडस् ऑन प्रोग्राम ऑन ऑर्डीनिओ बेस्ड रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ या विषयावर दि.२ मे ते दि.६ मे २०२३ दरम्यान या पाच दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  

    स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे विभागाच्या सहकार्याने व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या  प्रोग्राममध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थी व  प्राध्यापकांनी सहभाग घेतला. विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी प्रास्ताविकात ही पाच दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. या कार्यशाळेसाठी पुणे येथील डॉल्फिन लॅबचे व्यवस्थापकीय संचालक चित्तरंजन महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना ऑर्डीनिओ व रोबोटिक्स बद्दलची सविस्तर माहिती दिली तसेच ऑर्डीनिओ मध्ये कंट्रोलरचे प्रकार, विविध सेंसर्सची माहिती, ऑर्डीनिओचे प्रोग्राम करण्यासाठी लागणारे ऑर्डीनिओ सॉफ्टवेअर कसे वापरायचे हे देखील सांगितले. पुढे त्यांनी विविध सेन्सर्सचा वापर कसा करावा हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मोबाईल अॅप कसे बनवायचे हे सांगून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या रोबोटिक्सचे प्रोजेक्ट त्यांनी करून घेतले. या पाच दिवसीय कार्यशाळेमध्ये डॉल्फिन लॅबचे व्यवस्थापकीय संचालक चित्तरंजन महाजन यांनी ‘ऑर्डीनिओ व ब्लॅक लाईन फॉलोअर रोबोट, व्हाईट लाईन फॉलोअर रोबोट, टच मी नॉट रोबोट आणि फोटो मॅनिक रोबोट' असे या संदर्भातील विविध प्रोजेक्ट विद्यार्थ्यांकडून करून घेतले. या कार्यशाळेत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.शितल पवार यांनी काम पाहिले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा.राहुल पवार यांनी केले तर प्रा.आशुतोष गरड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad