*पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅक ए प्लस दर्जा प्राप्त*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अँक्रिडेशन कौन्सिलने (नॅक) पुढील पाच वर्षांसाठी ए प्लस दर्जा बहाल केला आहे. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. चेतन पिसे यांनी ही माहिती दिली.
या समितीने १८ व १९ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवस “राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदने” घालून दिलेल्या निकषानुसार शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, महाविद्यालय पातळीवर अभ्यासक्रम व अध्यापन-अध्ययन प्रक्रियेसाठी राबवले जाणारे उपक्रम, संशोधन व समाजाभिमुख राबवले जाणारे उपक्रम, विद्यार्थी विकासाच्या दृष्टीकोनातून उपलब्ध असणाऱ्या सुविधा, शिष्यवृत्ती, नोकरीच्या संधी, माझी विद्यार्थ्यांचा सहभाग, महाविद्यालयाचे प्रशासन, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, प्रशासन, आर्थिक स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक या सारख्या विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा, विविध क्षेत्रात महाविद्यालय कोणत्या पातळीवर आहे, पर्यावरण, ऊर्जा क्षेत्रातील काम तसेच महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे काटेकोर गुणात्मक क्षमतेने मूल्यांकन व मूल्यमापन केले. सर्व निकषांचे योग्यरित्या परीक्षण करून “राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद” यांच्याकडून १ मे २०२३ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी ए प्लस ग्रेड- ३.२८ सीजीपीए स्कोअर मान्यता दिली आहे.
सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. मारूती नवले व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय नवले यांनी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व सर्व टीमचे अभिनंदन केले.