कर्तव्य कॉमर्स क्लासेसचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार
कर्तव्य कॉमर्स क्लासेस ची स्थापना एप्रिल 2013 मध्ये झाली आज क्लासेस ची स्थापना होऊन 10 वर्षे पूर्ण झाली.
मागील दहा वर्षापासून कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा व कंधार तालुक्यात कॉमर्स शाखेवर आपले अधिराज्य गाजवित आहे, Account या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून या क्लासचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवित आहेत, तसेच 95.00% च्या वर गुण घेऊन इ. 12 वी चा आत्तापर्यंत चा सर्वात रेकॉर्ड ब्रेक निकाल देखील याच क्लासच्या नावाने आहे.
या 10 व्या वर्षात कर्तव्य कॉमर्स क्लासेस हे डिजिटल शिक्षणातही आपले पाऊल टाकून लोह्यात डिजिटल शिक्षण सुरू केले आहे, त्यासाठी लोहाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल बोर्ड आणणारा हा पहिलाच क्लास आहे. त्यासोबतच Santosh Sir's Commerce Wala या नावाने Play Store वर स्वतःच्या नावाचा एक App देखील या क्लासने बनविला आहे. क्लासेसच्या सर्व यशस्वी उभारणीमध्ये ज्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहवास लाभला आहे त्या सर्वांचे पूर्ण प्राध्यापकांनी आभार मानले आहेत, तसेच सर्व प्राध्यापकांनी आपल्या ज्ञानाचा उजाळा देऊन या क्लासला मागील दहा वर्षापासून लोहा तालुक्यात स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी योगदान दिले आहे त्या सर्व प्राध्यापकांचे देखील क्लासेसच्या संचालकांनी कौतुक करून आभार मानले आहे.
कर्तव्य कॉमर्स क्लासेस संचालक प्रा. गायकवाड सर हे नेहमीच म्हणतात कि अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्तित्व घडवावे लागते याच वाक्याला आज त्यांनी आचरणातही आणले आहे म्हणून हा क्लास आज लोहा तालुक्यात कॉमर्स शाखेवर अधिराज्य गाजून इ 11 वी पासून ते B.Com पर्यंतचे सर्व कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम करत आहे,.
या क्लासच्या पुढील वाटचालीस विद्यार्थी, पालक व क्लासेस क्षेत्रातील सर्व प्राध्यापकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.