*पंढरपूर सिंहगड मध्ये "स्पीच अँड रिझुम रायटिंग काॅम्पीटिशन" संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शुक्रवार दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी "स्पीच अँड रिझुम रायटिंग काॅम्पीटिशन" आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मेकॅनिकल इंजिनिअरींग स्टुडंट असोसिएशन वतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डी. पी. गानमोटे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. ऋषिकेश देशपांडे आदी च्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या "स्पीच अँड रिझुम रायटिंग काॅम्पीटिशन" स्पर्धेत डाॅ. श्याम कुलकर्णी, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे सम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे म्हणाले, जगाची गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञान शोधा. महाविद्यालयात असलेल्या सेवा सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आयुष्यात स्वतःचे कौशल्य ओळखुन शिक्षण घ्या. आयुष्यात जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे तुम्ही जास्त कणखर बनाल. स्वतःला झोकून देऊन मेहनत घेण्याचे आवाहन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.
मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात आयोजित करण्यात आलेल्या "स्पीच अँड रिझुम रायटिंग काॅम्पीटिशन" मधील विजयी स्पर्धाकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुरेश म्हमाणे, आर्या आराध्ये तर उपस्थितांचे आभार प्रगती दुधाळे व समाधान नवले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले