" *गेट आणि इंजिनिअरींग सर्विसेस एक्झामिनेशन तयारीमध्ये संयम अत्यंत आवश्यक"- सुनील तिवारी*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी "गेट आणि इंजिनिअरींग सर्विसेस एक्झामिनेशन तयारी" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करंडे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये भारत सरकारचे प्रसार भारती कार्यालयाचे असिस्टंट इंजिनिअर सुनिल कुमार तिवारी यांचे स्वागत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
सुनिल कुमार तिवारी हे सध्या मेड इजी ग्रुप मध्ये सिनियर फॅकल्टी म्हणून काम पाहत आहेत. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा व गेट परीक्षेचे तयारी कशी करावी ? अभ्यासाचे नियोजन व वेळचे नियोजन कसे करावे? या परीक्षा देत असताना संयम कसा बाळगला पाहिजे? याशिवाय परीक्षेतील यशाचे टार्गेट कसे सिद्ध केले पाहिजे याविषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी वृषाली वाघमारे हिने केले. या व्याख्यानात महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. अतुल आराध्ये, प्रा. शेखर पाटील, प्रा. नागनाथ खंडेकर इत्यादींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अभिजित सवासे यांनी काम पाहिले.