*पंढरपूर सिंहगड मध्ये आय. आय. सी. चे सञ संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल "लिंकेजेस् विथ ॲल्युमिनी इन्टरप्रेनर्स फाॅर मेन्टरिंग सपोर्ट" या विषयावर सिंहगड कॉलेज पंढरपूर मध्ये माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
हा कार्यक्रम ९ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सिंहगड कॉलेजमध्ये इंटरपनरशिप डेव्हलपमेंट स्टुडंट्स असोसिएशन आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी असे एकूण सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी महाविद्यातील सर्व प्राध्यापक उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे विद्यार्थी उद्योजक म्हणून काम करत आहेत. अशा विद्यार्थ्यांचा विभाग प्रमुखांनी त्यांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वांच्या समोर पीपीटीच्या माध्यमातून उद्योगांची व त्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्वतःबद्दल व त्यांच्या स्वरूप असलेल्या व्यवसायाबद्दल महत्वपूर्ण माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. जे उद्योजक म्हणून सध्या कार्यरत आहे अशा विद्यार्थ्यांचा संस्थेला आणि संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा याचा होणाऱ्या आहे.
संस्थेच्या माध्यमातून शंभरहून अधिक उद्योजक व सर्व रोजगार करणाऱ्या व्यक्ती आहेत या कार्यक्रमासाठी २० माजी उद्योजक उपस्थित होते आणि उद्योजक शिबीरासाठी मार्फत साठी लागणारा सपोर्ट देणार आहोत कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ बाळासाहेब गंधारे यांनी केली प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. विक्रम भाकरी, प्रा. मनोज कोळी आदीनी कार्यक्रम यशसवी होणेसाठी परीक्षम घेतले.