सोलापुरी जनतेचा पाण्यासाठी हाल, हे तर भाजपचे पाप,* 👉 *भाजपने महानगपालिकेत सत्ता असताना काम केले असते तर पाण्यासाठी आंदोलनाचे नाटक करण्याची गरज पडली नसती :- चेतन नरोटे*

 🟪 *सोलापुरी जनतेचा पाण्यासाठी हाल, हे तर भाजपचे पाप,*

👉 *भाजपने महानगपालिकेत सत्ता असताना काम केले असते तर पाण्यासाठी आंदोलनाचे नाटक करण्याची गरज पडली नसती :- चेतन नरोटे*


👉 *काँग्रेस पक्ष लवकरच आंदोलन करणार*


👉 *सोलापुर शहर काँग्रेसच्या वतीने निलम नगर येथे जय भारत सत्याग्रह अभियान सभा संपन्न*



दिनांक :- १२ एप्रिल २०२३



महागाई, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, शेतकरी कामगार विरोधी धोरणे, मोदी- अदानींचा भ्रष्टाचार, सोलापुर महानगपालिकेतील भाजपचा भोंगळ कारभार, राहुलजी गांधी यांच्यावर सुड़बुद्धिने केलेली कारवाई, केंद्र आणि राज्यातील भाजपा आणि खोके सरकारचा भ्रष्ठ आणि हुकुमशाही कारभाराच्या विरोधात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जुना प्रभाग १९ नीलम नगर इंदिरा चौक येथे जय भारत सत्याग्रह अभियान कार्यक्रमाचे आयोजन सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॉक उपाध्यक्ष सत्यनारायण संगा यांनी आयोजित केले होते.



यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे बोलताना म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या हुकुमशाही कारभार, जनतेची आर्थिक लूट, मोदी- अदांनींचा भ्रष्टाचार, आणि महापालिकेतील भाजपच्या भोंगळ कारभाराविरोधात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सोलापुर शहरात विविध ठिकाणी जय भारत सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आज त्यांच्याच एक भाग म्हणून निलम नगर येथे कार्यक्रम घेतला आहे. पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, परवा सोलापुरच्या पाणी प्रश्नावर भाजपच्या वतीने महानगरपालिकेत आंदोलन केले. केंद्रात, राज्यात आणि पूर्ण पाच वर्षे सोलापुर महानगपालिकेत भाजपची सत्ता होती तेव्हा लोकांचे पाणी प्रश्न आठवले नाही काय? आमच्या माय माउलींचा पाण्यासाठी चाललेला आक्रोश दिसला नाही काय ? आत्ता प्रशासक असताना आंदोलनाचे नाटक का? शहरी भागातील, झोपडपट्टयातील सार्वजनिक नळ कट करण्याचा भाजपचाच निर्णय होता. बोअर महीनों महीने दुरुस्ती केले जात नाहीत. हद्दवाढ भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सोलापुरचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. उन्हाळा सुरु आहे. आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. हे पाप भाजपचेच आहे. उजनी धरणात पाणी असूनही महापालिकेत सत्ता असताना पाणीप्रश्नावर काहीही केले नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून उजनी जलवाहिनीमुळे सोलापूरला एवढे तर पाणी मिळते पण भाजपच्या भोंगळ कारभारामुळे लोकांना त्रास होत आहे. शिंदे साहेबांनी सोलापूरच्या पाणीप्रश्नाची दखल घेऊन NTPC च्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईन साठी 250 कोटी मंजूर केले. महाविकास आघाडी सरकारने 200 कोटी रुपये मंजूर केले तरीही दुहेरी पाईपलाईनचे काम भाजपा पदाधिकाऱ्यांच्या टक्केवारीत अडकल्यामुळे सुरु करू शकले नाही ही भाजपसाठी लाजीरवाणी गोष्ठ आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनतेनेच ठरविले आहे की भाजपला पाणी पाजायचे त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आणि भाजपला लोकांचे पाणी प्रश्न आठवू लागली आहे त्यामुळे पाणी प्रश्नावर आंदोलनाचे नाटक सुरु आहे. हे चाललेय फक्त सत्तेसाठी, सोलापुरी जनतेला आणखी किती दिवस वेड्यात काढणार, जनता आत्ता शहाणी झाली असून येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच भाजपला पाणी पाजणार



तसेच पुढे बोलताना चेतन नरोटे म्हणाले की सत्यनारायण संगा आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आगामी काळात निलम नगर भागातील पाणी प्रश्न, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आदि मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


याकार्यक्रमात माजी महापौर अलकाताई राठोड, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, अँड केशव इंगळे, मा. परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, दीनानाथ शेळके, शिवशंकर अंजनाळकर, अँड शुभम माने, श्रीकांत वाडेकर, शिवानंद बलुरगी, राकेश मंथेन, लालू सानी, नरेश महेश्वरम, नागेश कैरमकोंडा, भीमाशंकर बालगावकर, महेश मोने, महेंद्र शिंदे, चंदू नाईक, अनिल मोने, दिनेश रच्छा, रवि दुस्सा, अनिल रच्छा, रवि संगा यांच्यासह त्या भागातील नागरिक बंधु भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.


▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad