लोहा कंधार तालुक्यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
नांदेड जिल्हा नियोजन समिती, मूलभूत सुविधा आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने खासदार सुधाकर शृंगारे यांनी मागणी केलेल्या बहुतांश विकासकामासाठी 11 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोहा आणि कंधार तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी हा निधी पाठपुरावा करून खासदार सुधाकर शृंगारे यांनी मंजूर करून घेतला आहे. --- लोहा,कंधार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत रोहित्राची मुख्य समस्या होती, शेतकरी तशी मागणी करीत होते. मात्र आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रोहित्र आणि वाहिनी उभारणीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे.त्यासाठी लागणारा निधीही मंजूर करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा नियोजन समितीकडून खासदार सुधाकर शृंगारे यांनी मागणी केल्या प्रमाणे विविध विकासकामांसाठी 9 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मूलभूत सुविधा म्हणजेच 25/15 मधून लोहा आणि कंधार तालुक्यातील कामांसाठी 1 कोटी 43 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाकडे मागणी करण्यात आल्या पैकी 50 लाख रुपयांचा निधी दलितवस्ती सुधार योजेतून मंजूर करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातल्या सुगाव,सोनमांजरी, वडेपुरी,मुरंबी. तर कंधार तालुक्यातल्या वहाद,वरवंट, तळ्याची वाडी,हळदा, ढाकुतांडा, खेमातांडा,चिखली,बारुळ अश्या अनेक गावातील रोहित्र उपलब्ध करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर रस्ते,नाली, सभागृह बांधकाम, अश्या अनेक कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.-- जिल्हा नियोजन समिती 9 कोटी 75 लाख, मूलभूत सुविधासाठी 1 कोटी 43 लाख, दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत 50 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.लोहा,कंधार तालुक्यातसाठी हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीशजी महाजन यांचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी आभार मानले आहेत