काँग्रेसचे पक्ष्याचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; अनेक मान्यवरांनी केले अभिष्टचिंतन
जनतेच्या व काँग्रेस पक्षाच्या सत्कार्यासाठी माझे जीवन खर्च करणार -शरद पाटील पवार
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा तालुका काँग्रेस पक्षाचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर लोहा शहर तालुका व जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे.यावेळी प्रथम रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम सुरू झाला . यावेळी शरद पाटील पवार यांचा भव्य सत्कार आ. शामसुंदर शिंदे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी शाल , श्रीफळ व पुष्पहार घालून पेढे भरवून अभिष्टचिंतन केले. तसेच काँग्रेसचे जिल्हा काँग्रेस चे संतोष पांडागळे, तसेच लोहा न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार यांनी लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून सत्कार केला, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर,काँग्रेसचे गटनेते नगरसेवक पंचशील कांबळे, भास्कर पाटील जोमेगावकर,
जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब गोमारे, पं. स. सदस्य श्रीनिवास मोरे, शिक्षक नेते विठ्ठूभाऊ चव्हाण , बालाजी चव्हाण, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, पंकज परिहार, खंडू पाटील पवार, शिवाजी आंबेकर, चंद्रकांत नळगे, सतीश देवकते, व्यंकट घोडके, अकबर मौलाना, उतम महाबळे , राम पाटील पवार वर्ष केतू पाटील कराळे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, मधुकर पाटील वानखडे, साईनाथ पाटील ,फाजगे, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, भीमराव पाटील शिंदे, सतार शेख, नगरसेवक संदीप दमकोंडवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, सचिन सुर्यवंशी, यांच्या सह लोहा शहरातील व्यापारी, नागरिक, ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, शेतकरी शेतमजूर, पत्रकार बांधव, यांच्या सह हजारोंचा जनसागर शुभेच्छा देण्यासाठी उसळला . तसेच यावेळी शहरात चाहत्यांनी अनेक बॅनर बाजी व फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून शुभेच्छाचा वर्षाव केला
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे,माजी मंत्री डी.पी. सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, आदी मान्यवरांनी भ्रमणध्वनी द्वारे शरद पाटील पवार यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार म्हणाले की, लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता सामाजिक व राजकीय जीवनात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीब जनतेचे , शेतकरी शेतमजूर, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. माझे उर्वरित आयुष्य हे जनतेच्या व काँग्रेस पक्षाच्या सत्कार्यासाठी खर्च करणार माझ्या वाढदिवसानिमित्त लोहा शहर,तालुका व जिल्ह्यातील मान्यवरांनी सामान्य नागरिकांनी माझ्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांवर जो अभिनंदनाचा वर्षाव केला आहे त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार म्हणाले.