पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची युथ फेस्टिव्हल मध्ये बाजी
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये अभियांत्रिकीचा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या "इंजिनिअर युथ फेस्टिव्हल" मध्ये यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
सोलापूर येथे घेण्यात आलेल्या "इंजिनिअर युथ फेस्टिव्हल" मध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कबड्डी संघाने प्रथम क्रमांक, क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केले असून तसेच मराठी कविता वाचन आरती ढेरे प्रथम क्रमांक व श्रद्धा कुलकर्णी द्वितीय क्रमांक, हिंदी कविता वाचन प्राजक्ता बागल प्रथम क्रमांक, मराठी निबंध लेखन दिव्या जाधव, साक्षी जवंजाळ, पारंपारिक वेशभूषा द्वितीय क्रमांक तसेच टेक्निकल विभागामध्ये यशराज गवळी, दिशा होनमाने व धनाजी भालेराव यांनी स्टार्टअप मधुन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय कॅड मध्ये सोमनाथ मिसाळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचा प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना डाॅ. अतुल आराध्ये व प्रा. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.