लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्याची प्रणव परिचारक यांची मागणी

 लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करण्याची प्रणव परिचारक यांची मागणी-




पंढरपूर- 

महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दोन रेल्वे भुयारी मार्ग करावेत अशी मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवक नेते प्रणव परिचारक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकास केली.

दरम्यान या मागण्यांची अधिकाऱ्यांनी तातडीने दाखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.




रेल्वे मंत्रालयाच्या प्रवासी सेवा सुविधा समितीचा सध्या सोलापूर दौरा सुरू आहे. या दौऱ्यामध्ये या समितीने पंढरपूर रेल्वे स्थानकास भेट देऊन परिसराची पाहणी केली. सदर पथका बरोबर प्रणव परिचारक यांनी पाहणी करून विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 यावेळी पंढरपूर शहरांमध्ये असणाऱ्या दोन अंतर्गत रेल्वे भुयारी मार्गाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने व इतर अंतर्गत भुयारी मार्ग वाढवण्याच्या दृष्टीने यावेळी प्रणव परिचारक यांनी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवासी सेवा सुविधा समितीकडे मागणी केली.

तसेच पंढरपूर-मुंबई, पंढरपूर-नागपूर, पंढरपूर-कोल्हापूर ,पंढरपूर सांगोला, पंढरपूर-कुर्डूवाडी या रेल्वे गाड्या दररोज कराव्यात. तसेच काही साप्ताहिक रेल्वे गाड्या सुरू कराव्यात. सरगम चौक व टाकळी रोड येथे नव्याने अंतर्गत भुयारी मार्ग विकसित करावा. जेणेकरून पंढरपूर शहरात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला कुठल्याही प्रकारची अडचण न येता स्थानिक नागरिकांची व प्रवाशांची अडचण होणार नाही. लक्ष्मी टाकळी चौक व भटुंबरे चौक येथील रेल्वे ट्रॅकवर ओव्हर ब्रिज व्हावा, तिर्थक्षेत्र पंढरपूर व भाविक भक्तांच्या अनुशंगाने स्टेशनमध्ये लिफ्ट व स्वयंचलित जिने बसवून पायाभुत सुविधा तसेच स्टेशन मेकओव्हरसाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली. 



विशेष म्हणजे या समितीकडून तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना परिचारक यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नव्याने होणाऱ्या पालखी मार्गाबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या रेल्वेच्या अंतर्गत भुयारी मार्गाचे प्रश्न देखील आता सुटले जाणार आहेत.

यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांच्यासोबत मा.काशिनाथ थिटे, माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, धर्मराज घोडके, मिलींद येळे, लाला पानकर, आबा पवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad