तेलंगणा सरकार विकास करू शकत तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही के चंद्रशेखर राव.
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
देवेंद्र जी तेलंगणा सारखा विकास महाराष्ट्रात करण्याची गरज भासत असल्यामुळे तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू करा असे सांगत ते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की दलितबंधू योजना अमलात आणून दाखवा मी महाराष्ट्राचा दौरा करणार नाही ते लागू नाही केल्यास महाराष्ट्रात दौरे करणार असल्याचे केसीआर म्हणाले आहे
लोहा येथे आयोजित विराट सभेत बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर म्हणाले की देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एक काम करणार का ? असा सवाल करीत ते पुढे म्हणाले की
तुम्ही सदरचे काम करत नसाल तर आम्ही वारंवार महाराष्ट्रात येऊ माझ्या लोहा येथील सभेला लोक येऊ नये म्हणून गावागावात लोकांना बनविण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप के सी आर यांनी केला
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांची लोहा येथे दिनांक २६ मार्च २०२३ रोजी विराट सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी आर्मुरचे आमदार रेडी, बोधन चे आमदार शेख, मा. आ.शंकर अण्णा धोंडगे, यशपाल भिंगे, नागनाथ भिसेवाड, सुरेश गायकवाड, संजय पाटील कराळे,मनोहर भोसीकर, हरिभाऊ राठोड, शिवराज धोंडगे, दिलीप धोंडगे आदी विशेष मान्यवरांची उपस्थिती होती
लोहा येथील आयोजित केलेल्या आयोजित केलेल्या जाहीर सभेत केसीआर म्हणाले की वारंवार नांदेडला जाता सोलापूरला येणार नाही का ? असा सवाल सोलापूरच्या शेतकऱ्यांनी केला असून मला नांदेड मध्ये दोनदा यावे लागले हे येथील लोकांची आपुलकी व अतिशय प्रेम असल्यामुळे मी येत आहे
के सी आर म्हणाले की ७५ वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळाले माझे विचार भाषण लक्षात ठेवा आणि जरूर त्यावर चर्चा करा या देशात ७५ वर्षातील ५४ वर्षे काॅंग्रेस आणि १६ वर्ष भाजपने सत्ता चालवली यात काही फरक पाहायला मिळाला नाही ? परंतु पक्ष आणि त्यांच्या नेत्याला फरक पडला आहे
देशातील शेतकऱ्यांना काहीच फरक झाला नाही. दोन्ही पक्षात काही फरक नाही मग या दोन पक्षांना मत देऊन काहीच फायदा नसल्याचे मत ही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लोहा येथे आयोजित केलेल्या विराट सभेत बोलत होते