आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी उपसा प्रकल्पातील 12 पंप उद्धरणनलिका नवीन बसवण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर

आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विष्णुपुरी उपसा प्रकल्पातील 12 पंप उद्धरणनलिका नवीन बसवण्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी मंजूर

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



कै.शंकरावजी चव्हाण विष्णुपुरी सिंचन प्रकल्पातील गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पातील 12 विद्युत पंप व उद्धरणनलिकाची अत्यंत बिकट अवस्था झाली असल्याने हे विद्युत नादुरुस्त असल्याने विद्युत पंप व उद्धरणनलिकेमुळे लोहा तालुक्यातील 15927 हेक्टर व कंधार तालुक्यातील 2100 हेक्टर जमिन सिंचनापासून पासून वंचित राहून लोहा कंधार मतदारसंघातील एकूण 18027 हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहून शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या धरण उशाशी पण पण शेतकरी उपाशी राहत असल्याने मतदारसंघातील शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या हवालदील झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर लोहा कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय  कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च 2023 च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवून कै. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तात्काळ 12 विद्युत पंप व उद्धरणनलिका बदलण्यात येऊन नवीन विद्युत पंप व उद्धरणनलिका बसण्यात येण्याची मागणी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अधिवेशनात करताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे विद्युतपंप व उद्धरणनलिका तात्काळ दुरुस्तीसाठी 125 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झालेल्या विद्युत पंप उद्धरणनलिका आता काही दिवसातच नवीन कोऱ्या बसवल्या जाणार असल्याने व या कामासाठी 125 कोटी रुपयांचा निधी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी  अधिवेशनात आवाज उठवल्याने मंजूर झाल्याने आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे लोहा कंधार मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad