कंधार येथून येणारे लोहा बायपास जवळ लाकडीमालाने भरलेले ट्रॅक्टर वनविभागाने केले जप्त

कंधार येथून येणारे लोहा बायपास जवळ लाकडीमालाने भरलेले ट्रॅक्टर वनविभागाने केले जप्त


नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 




दि. २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १/२०२३ रोजी गुपित माहिती मिळाल्यावरून दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० सुमारास कंधार कडून लोहाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्या लगतच्या बायपास जवळी वन विभागाने एका ट्रैक्टर ट्रॉली मध्ये जळीव लाकडी भरून ट्रॅक्टर महिंद्रा ५८५ ट्रॅक्टर हेड एम एच २६ बी एक्स २४८९ हा नंबर असून ट्रेलि क्रमांक एम


एच २६. टी १८६ हे वाहन जळीव लाकूड घेऊन विनापरवाना वाहतूक करीत असता लोहा वनरक्षक पि.आर. घुगे यांच्या नजरेस आले, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंह ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड एस. डी. शिंदे, वनपरिमंडळ अधिकारी अशोक क्यादरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पि.आर. घुगे व नारायण शेवडीकर वनसेवक यांनी या ट्रॅक्टर मालकाकडे वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता सदरील ट्रॅक्टर मालकाकडे पास दिसून आली नाही त्यावरून सदरील ट्रॅक्टर्स व जवळ मुद्देमाल ताब्यात घेऊन वन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad