स्व.वसंतराव ( दादा ) काळे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त...... सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न.........

 स्व.वसंतराव ( दादा ) काळे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त......

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न.........

------------------------------------------------------------------------------



भाळवणी ( दि.05 ) :--- संस्थापक सहकार शिरोमणी स्व्. वसंतराव ( दादा ) काळे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार शिरोमणी कारखाना व वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 जानेवारी ते 05 फेब्रुवारी या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील पटकुरोली, तुंगत, कासेगांव येथे मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर भाळवणी येथे सदर सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीरामध्ये सुमारे 360 गरजुंची तपासणी मोफत करण्यात आली.*



शिबिराचे उद्घाटन वसंतदादा मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक भारत कोळेकर, मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, गोरख जाधव, आण्णा शिंदे, योगेश ताड, युवराज दगडे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, तालुकाध्यक्ष कॉग्रेस आय हणमंत मोरे, जिल्हा संघटक आर.पी.आय सचिन भोसले, बीजेपीची जिल्हा सचिव वंदना पंत व कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले.


कार्यक्रमाचे सुरुवातीस श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे व संस्थापक सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.   



*सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी स्व्.दादांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त् गोर गरिबाची सेवा घडावी या हेतुने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, कारखाना कार्यस्थळावरील व परिसरातील गोर गरिब गरजुना तसेच कामगारांना व त्यांचे कुंटुंबियांसाठी मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.सुधिर शिनगारे यांनी जनकल्याण हॉस्पीटलच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांची व हॉस्पीटलच्या वतीने विविध आजारावर करण्यात येत असलेल्या इलाजाची माहिती दिली.*


सदर रुग्णांवर कारखान्याच्या मेडिकल ऑफिसर डॉ.सौ.जयश्री शिनगारे, पंढरपूरातील नामांकित बालरोग तज्ञ संदेश पडवळ, ओजस देवकते, नेत्ररोग तज्ञ मनोज भायगुडे, जनरल सर्जन सुजित जाधव, सुश्रुत चव्हाण, चेस्ट फिजिशियन सौ.सिमा इंगोले, आस्थिरोग तज्ञ रोहीत शिंदे, विजयकुमार मुढे, मेडीसन अजित जाधव तसेच जनकल्याण हॉस्पीटलच्या डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केले. तसेच शिबीर यशस्वी करणेसाठी जनकल्याण हॉस्पीटलचे व्यवस्थापक सद्दाम मनेरी, आण्णासाहेब डुबल यांनी परिश्रम घेतले. 



 यावेळी कारखान्याचे डेप्यु.जन.मॅनेजर के.आर. कदम, टेक्निकल जनरल मॅनेजर प्रकाश तुपे, चिफ इंजिनिअर एस.एन.औताडे, डिस्टीलरी मॅनेजर पी.डी.घोगरे, मुख्य शेती अधिकारी अे.व्ही.गुळमकर, सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, को-जन मॅनेजर संभाजी डुबल, चिफ अकैंटंट बबन सोनवले, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर कुंभार, हेडटाईम किपर संतोष काळे, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad