*परफेक्ट इंग्लिश मिडीयम* *स्कूल येथे* *माता पित्यांचा पाद्यपूजन* *सोहळा* *भावनिक वातावरणात*
कवठे महांकाळ : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कित्येक नवीन नाती निर्माण होतात पण आयुष्यभर सोबत राहणारे आणि टप्प्या टप्प्याने नव्याने उलगडणार केवळ एकच नात असतं आणि ते म्हणजे आई वडिलांसोबत असणार नातं.आई बाबा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचे दोन खांब,जे जीवनाच्या अडखळत्या रस्त्यावर मदतीसाठी खंभीररित्या उभे असतात.
यातील एक खांब म्हणजे परफेक्ट इंग्लिश मिडीयम* *स्कूल येथे* *माता पित्यांचा पाद्यपूजन* *सोहळा* *भावनिक वातावरणात*
आई.आई म्हणजे माधूर्याचा सागर आणि पावित्र्याचे आगर,फुलांची कोमलता,गंगेची पवित्रता,चंद्राची रमणीयता,सागराची अनंतता,दृष्टीची क्षमाशीलता आणि पाण्याची रसता.दुसरा खांब म्हणजे वडील.वडील म्हणजे अथक परिश्रम घेणारे शरीर,अपरिमित काळजी करणारे मन,मुलांसाठी झटणारे अंतकरण.उद्याच्या सुर्यासाठी काळोखाशी लढणारी,साऱ्या परिवारासाठी झिजणारी,लेकरांच्या अस्तित्वासाठी जळणारी, ऊन,वारा,पाऊस झेलणारी व्यक्ती म्हणजे वडील होय.
माता पित्यांची सेवा करणाऱ्यांना दीर्घायुष्य,यश,स्वर्ग,कीर्ती,पुण्य,बळ,लक्ष्मी,सुख नक्कीच प्राप्त होते असे म्हंटले जाते आणि हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून कुची येथील परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने मातृ पितृ दिवस साजरा करीत माता पित्यांच्या पाद्य पूजनाचा आगळा वेगळा सोहळा आयोजित करण्यात आला.या सोहळ्याची सुरुवात कुचीचे लोकनियुक्त सरपंच सहदेव गुरव,माजी उपसरपंच विजयराव पाटील,ग्रामपंचायत सदस्या नंदा पाटील,कुची विकास सोसायटीच्या संचालिका स्नेहल शिंदे,पत्रकार जालिंदर शिंदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी स्कूलच्या चिमुकल्यांनी मोठ्या धार्मिक वातावरणात मंत्र उच्चारण करीत उपस्थित माता पित्यांचे पाद्य पूजन केले.चिमुकल्यांनी केलेले हे पूजन,केलेला सन्मान पाहून उपस्थित माता पित्यांचे डोळे पाणावले.देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या पित्याच्या आठवणीत काही चिमुकल्यांना ही अश्रू अनावर झाले परंतु देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या पित्याचा अभिमान असल्याचे त्या चिमुकल्यांनी या सोहळ्यात मोठ्या अभिमानाने मत व्यक्त केले.
या सोहळ्याचे आयोजन स्कुलचे मॅनेजिंग डायरेक्टर धनंजय शिंदे,संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील,सचिव नानासाहेब पाटील,स्कूलच्या प्रिन्सिपॉल रुपाली पाटील,शिक्षिका स्वाती पाटील,प्रमिला भोसले, रेखा चव्हाण,स्वाती कदम,रुक्मिणी माळी,रीमा सोरटे,ज्योती हेळवी यांनी केले होते.यावेळी स्कूलचे विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि त्यांचे माता पिता तसेच शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्गाचे माता पिता,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जन्मदाते आई वडिलाप्रती प्रेम व्यक्त करणारा,त्यांच्या त्यागाचा गौरव करणारा सोहळा आयोजित केल्या बद्दल परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.