लोहा न.पा. ला आला नविन घरकुलासाठी 11कोटी 74लाख निधी ;
लाभार्थ्यांनी तात्काळ कागद पत्रे न.पा.त सादर करून घरकुलाचे कामे सुरू करावेत --- नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी
----------------------------------------
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा नगर परिषदेला नवीन घरकुलासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी 11कोटी 74 लाख रुपयांचा निधी आला असून पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ लोहा न.पा.त कागदपत्रे सादर करून घरकुलाचे कामे सुरू करावेत असे आवाहन लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.
लोहा शहरातील गोरगरिब नागरिकांना ऊन वारा पाऊस थंडी यापासून बचाव होण्यासाठी स्वतः च्या हक्कांचे पक्के सिमेंट काँक्रिट व स्लॅब चे घर मिळावे यासाठी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे सतत प्रयत्नशील आहेत.
लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून लोहा शहरातील गोरगरिब नागरिकांना पहिल्या डिपी आर 746 घरकुले मंजूर झाली तर दुसरा डीपीआर मध्ये 950 घरकुले मंजूर झाली तर तीसरा डीपीआर मध्ये एकुण292 घरकुले मंजूर झाली आहेत असे सर्व मिळून 1988 घरकुल मंजूर झाली आहेत पहिल्या डीपी आर मधील बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांनी बांधकाम चालू करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. व नविन घरकुलासाठी एकुण 11 कोटी 74 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तेव्हा लोहा शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी लोहा न.पा.तील कर्मचारी इंजी मेघा पांचाळ, अक्रम शेख, इंजी नाईक यांच्याशी संपर्क साधावा व तात्काळ घरकुलाचे कामे सुरू करावेत असे आवाहन लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले आहे.तसेच चौथ्या डि पी आर लवकरच पाठवायचा आहे लोहा शहरातील नागरिकांनी आपली कागदपत्रे तयार करून लवकरात लवकर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसी संपर्क साधावा असे आवाहन लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांनी केले आहे.