लोहा शहरात श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 लोहा शहरात  श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

----------------------------------------

* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




लोहा शहरात  दि. ३ फेब्रुवारी रोजी भगवान श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भगवान श्री विश्वकर्मा यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक सकाळी ८ ते १० दरम्यान देऊळगल्ली ते व्यंकटेश गार्डन पर्यंत काढून व्यंकटेश गार्डन येथे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर व्यंकटेश गार्डन येथे ११ ते १ हभप श्री प्रकाश महाराज साठे बीडकर ( झी टाॅकीज)फेम  यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी २ ते ४ दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.



यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार रोहिदास चव्हाण, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे शिवाभाऊ नरंगले,माजी जिल्हा परिषद सभापती संजय पाटील कराळे, लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पाटील पवार, माजी नगरसेवक उत्तमराव महाबळे ,माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, अशोक हावरगे, पाटील नगरसेवक संदीप दमकोंडवार,नबीसाब शेख, केतन खिल्लारे,माजी सैनिक व्यंकट घोडके, माजी नगरसेवक पंकज परिहार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार,टायगर ग्रुपचे तालुका अध्यक्ष वैभव भैया हाके, अॅड विठ्ठल कवडे लोहा पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधु कंधार येथील पत्रकार प्रल्हाद आगबोटे सर,अॅड रवी कुमार कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोहा तालुक्यातील सर्व विश्वकर्मा समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.