सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांच्या वतीने लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त लोहा येथील पत्रकारांचा काढला २ लाखांचा विमा
----------------------------------------
* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहा येथील सर्व पत्रकार बांधवांचा कै. माणिकराव पाटील पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांच्या वतीने २ लाख रुपयांचा विमा उतरविला असुन त्यांचे वितरण दि. ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो ऊन,वारा, पाऊस, थंडी आदीची पर्वा न करता रात्रंदिवस समाजाची सेवा करतो शासन - प्रशासनाला जागो करतो शेतकरी - शेतमजूर सामान्य माणसाला न्याय मिळवून देतो अन्याय अत्याचाराला वाचा फोडतो तेव्हा सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचा २ लाख रुपयांचा विमा लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांच्या वतीने नुकताच काढण्यात आला व त्यांचें वितरण दि. ४ फेब्रुवारी रोजी सुधाकर पाटील पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मिडिया पोलिस सोशल क्लबचे लोहा तालुकाध्यक्ष विलास सावळे, जेष्ठ पत्रकार मुर्तुजा शेख, गोविंद पाटील कदम, विजय चन्नावार, संजय कहाळेकर, संतोष चेऊलवार, पत्रकार शुभम सावकार उत्तरवार विश्वनाथ कांबळे, संजय रहाटकर, बाळासाहेब बुध्दे , हनमंत कंधारे आदी उपस्थित होते.
लोहा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त सुधाकर पाटील पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबवून लोहा येथील सर्व पत्रकार बांधवांचा २ लाख रुपयांचा विमा काढल्याबद्दल त्यांचे लोहा येथील सर्व पत्रकार बांधवांनी आभार मानले.