शेतातील उभी पिके जळून वीज बील वसुलीची पद्धत बंद करा, अन्यथा स्वाभिमानी हिस्का दाखऊ..!*

 *शेतातील उभी पिके जळून वीज बील वसुलीची पद्धत बंद करा, अन्यथा स्वाभिमानी हिस्का दाखऊ..!



पंढरपूर/प्रतिनिधी

                  तहसिलदार सुशील बेलेकर साहेबाना भेटून निवेदन दिले,पंढरपूर तालुक्यातील शेतीपंपासाठी सुरू असलेला वीज पुरवठा महावितरण कडून कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित करण्यात आला आहे त्यामुळे लाखो हेक्टर वर शेतकऱ्यांची उभा असलेली पिके पाणी असताना केवळ आडमोटेपणाने वीज पुरवठा बंद केल्यामुळे जळण्याची शक्यता आहे

            माणसांचा व जनावरांच्या पिण्याचे पाणी द्राक्ष डाळिंबीच्या बागा वेलवर्गीय पिके इत्यादी आणि भरत असताना अचानकपणे कोणतीही पूर्व सूचना न देता एम एस ई बी कडून वीज पुरवठा खंडित केलेला आहे त्यामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची परिस्थिती पंढरपूर तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे

          तरी एम एस ई बी ने वीज पुरवठा बंद केल्यामुळे जर शेतकऱ्याचे नुकसान झाले तर आपल्या कार्यालयाकडून त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी नाहीतर एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्याव्या वीज पुरवठा हा अचानक बंद केल्यामुळे मोठे नुकसान होते त्यामुळे वीजपुरवठा बंद न करता आधी पुर्व सुचना देऊन गावपातळीवर बैठका घेऊन शेतकऱ्यांसोबत समन्वय साधावा 

             अचानक वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे नुकसान केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार असेल..

            यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कारखान्यांचे संचालक तानाजी काका बागल तालुकाध्यक्ष विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन पाटील जिल्हा संघटक रायप्पा हळद माढा विधानसभा अध्यक्ष नानासाहेब चव्हाण हरिरा नगर गोरख चव्हाण सचिन बागल प्रकाश माळी इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad