पुणे शहर MCOCA मध्ये अटकेतून पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन हद्दीतून पोलीस पथकावर हल्ला करून पळालेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार टेंभुर्णी पोलिसां कडून पाठलाग करून शिताफीने अटक*

 पुणे शहर MCOCA मध्ये अटकेतून पुणे ग्रामीण हवेली पोलीस स्टेशन हद्दीतून पोलीस पथकावर हल्ला करून पळालेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार टेंभुर्णी पोलिसां कडून पाठलाग करून शिताफीने अटक* 

केले बाबत -



मार्केट यार्ड पोलीस ठाणे पुणे शहर गुर नंबर 173/ 2022 भादवी कलम 395, 397 ,120 ब कलम सह मोक्का अधिनियम मधील अटक आरोपी व पोलीस पथकावर हल्ला केल्या नन्तर दाखल हवेली पोलीस ठाणे गुर नंबर 42/2023 भादवी कलम 307 ,353 ,332 ,224, 34 यातील पाहिजे आरोपी राहणार खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे* हा मार्केट यार्ड पोलीस ठाणे कडील MCOCA गुन्ह्याचे तपासकामी घेऊन गेले असता पोलीस  पथकावर हल्ला करून दिनांक 01/02/2023 रोजी पळून गेल्याने नमूद हवेली पोलीस ठाणे कडील गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 आज रोजी पुणे शहर कडील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नमूद आरोपी हा टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत लोकेशन असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील DB पथक पीएसआय काशीद ,पीएसआय चंदनशिव, पोलीस हवालदार 1763 क्षीरसागर , पोलीस नाईक 1576 साठे, पोलीस शिपाई 711 माने देशमुख यांचे पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत असताना  पोलिसांना बघून पळून जात असताना सदर पथकाने 2 किलोमीटर पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडला आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे सो , मा अपर पोलीस अधीक्षक श्री हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. सदर अटक आरोपीस योग्य त्या प्रक्रियेद्वारे पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad