*समर्थ कोचिंग क्लासेस संगमवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व भाषण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.*
कंधार ता.प्र शिवराज पाटील इंगळे
७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने समर्थ कोचिंग क्लासेस संगमवाडी येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण ,एकांकिका,आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सर्व विध्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उपस्थित श्रोत्यांचे मने जिंकली.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या अंगीअसलेल्या सुप्त गुणांचा सर्वांगीण व व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून समर्थ कोचिंग क्लासेस संगमवाडी येथे संस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये विविध प्रकारचे नृत्य व भाषणे विद्यार्थ्यांनी केली म्हणून जे विद्यार्थी भाषण व नृत्य करून उपस्थित गावकऱ्यांची मने जिंकली.
सर्व विद्यार्थाचा सर्वागीन विकास होण्याकरीता ह्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समर्थ कोचिंग क्लासेस चे संचालक माधव गोटमवाड सरने आपल्या प्रस्ताविक भाषनातून सर्व मान्यवरांना व विद्यार्थी वर्गाना संबोधीत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - संभाजी गुट्टे साहेब ( मा.सैनिक इंडीयन आर्मी )व प्रमुख पाहुणे - देवराव घुगे ( वनपाल), सुनील राठोड सर , पंकज ढवळे सर , संतोष कांबळे सर, जनाबाई घुगे, शिवकांता करेवाड, रामु गोटमवाड उपस्थित होते.
सर्व विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कला गुणांना वाव म्हणुन आज विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संभाजी गुट्टे (माजी सैनिक इंडीयन आर्मी )उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवराव घुगे( वनपाल)सुनील राठोड सर,पंकज ढवळे सर,संतोष कांबळे सर जनाबाई घुगे,शिवकांत करेवाड,रामू गोटमवाड यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा समर्थ कोचिंग क्लासेस संगमवाडी येथे मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.
तसेच संगमवाडी नगरीचे भूमिपुत्र देवराव घुगे यांची नुकतीच वनपाल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित सर्व पालकांनी ट्युशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व भाषणाचे कौतुक केले व पुढेही असेच यशस्वी कार्य ट्युशन मध्ये होत राहावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - संतोष कांबळे यांनी केले तर
आभार माधव गोटमवाड यांनी मानले ..